खेड : तालुक्यातील भडगाव खोंडे गावातील कातवाडी येथील ४० वर्षीय मिलिंद बाळा मांडवकर याचा कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. दि. २७ रोजी सकाळी १० वाजता मिलिंद बाळा मांडवकर (वय ४०) याची अचानक तब्येत बिघडल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांची कोणतीच हालचाल न आढळल्यान त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 30/Nov/2024














