आंबा घाटातील दख्खन गावात सुरुंग लावण्याच्या कामामुळे घबराट

साखरपा : मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण काम नाणीज ते आंबा घाट मार्गावर वेगात सुरू आहे. आंबा घाटामध्ये असणाऱ्या दख्खन गावात डोंगर कटाई काम सुरु आहे. या ठिकाणी असणाऱ्या कातळ दगडावर भू-सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. यामुळे स्थानिकांना याचा त्रास होत आहे.

हे गाव दरड क्षेत्र म्हणून ओळखले जाते. २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीवेळी या गावात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्याचबरोबर एका घरावर पूर्ण दरड आल्याने मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने घरात कोणी नसल्याने लोक बचावले होते. अशी गंभीर परिस्थिती असतानाही या ठिकाणी धोकादायकरित्या सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. यामुळे मोठमोठा आवाज आणि दगड सर्वत्र उडत आहेत. त्याचबरोबर शाळाही जवळ आहे. स्थानिकांनी याठिकाणी काम देखील रोखले होते. त्याचबरोबर या क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांच्याकडे देखील निवेदन देण्यात आले आहे. तरीही सुरुंगसाठी खड्डे मारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 30/Nov/2024