गुहागर : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी उद्योजकता विकास या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही – कार्यशाळा महाविद्यालयातील – कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभागाच्या – वतीने आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मूनी लूप्सचे संस्थापक तसेच – महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी, युवा उद्योजिका स्मृती चव्हाण यांनी ऑनलाईन पद्धतीने हे सत्र घेतले. त्यांनी उद्योजकता विकासातील समस्या सोडवण्यासाठी विविध पद्धती आणि नवीन कल्पना शोधण्याचे प्रभावी तंत्र याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून कॉम्प्युटर विभागाच्या प्रा. राधिका कदम व प्रा. कृष्णा मालठाणकर यांनी काम पाहिले. कॉम्प्युटर विभागाचे विभागप्रमुख प्रा. केतन कुंडीया, उपप्राचार्य अविनाश पवार आणि प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वी झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 30/Nov/2024














