तळवली : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा देव दीपावली उत्सव रविवार दिनांक 1 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे यावेळी गावामध्ये जत्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
गुहागर तालुक्यातील तळवली येथील ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा देव दीपावली उत्सव तळवली गावाच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामदेवता श्री सुकाई देवी जागृत देवस्थान असून अनेकांचे श्रद्धास्थान आहे. विविध ठिकाणाहून भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. शिमगोत्सवात देखील मोठ्या उत्साहाने देवीचा उत्सव साजरा केला जातो. बाहेरगावी कामानिमित्त असलेले भाविक यावेळी देवीच्या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. देव दीपावली निमित्त साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवात देवीला रूपे लावण्यात येते तसेच श्री त्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. यावेळी गावासहित पंचक्रोशीतून येणाऱ्या ग्रामस्थांना महाप्रसादाचे नियोजन देखील गावाच्या वतीने करण्यात येते. यावेळी शनिवारी 30 रोजी एक विशेष सन्मान सोहळा ग्रामदेवता कमिटीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री सुकाई देवीच्या लेकी म्हणजेच माहेरवाशीणींचा सन्मान सोहळा पार पार पडणार आहे.
यावेळी पार पडणाऱ्या या उत्सवामध्ये सकाळी 8.30 वा श्री सत्यनारायण महापूजा व हळदीकुंकू, सकाळी 11.30 वाजता महाआरती, दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद, संध्या. 7 वाजता हरिपाठ (वारकरी मंडळी तळवली) रात्री 9.30 वाजता भजन (देऊळवाडी), रात्री 10.30 वाजता श्री सुकाई देवी बहुरंगी तमाशा पार पडणार आहे तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुकाई देवी ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी ग्रामदेवता कमिटीच्यावतीने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 30/Nov/2024













