साखरपा : साखरपा येथून सकाळच्या वेळी रत्नागिरीला जाण्यासाठी एसटी फेरी सुरू करण्यात आली होती. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली ही एसटी अवघ्या महिन्याभरात बंद झाल्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय जोत आहे.
साखरपा स्थानकातून सकाळी रत्नागिरीला जाण्यासाठी योग्य एसटी फेरी नव्हती. त्यामुळे सकाळी साडेसात वाजता साखरपा रत्नागिरी ही एसटी फेरी सुरू करावी, अशी मागणी कोंडगाव ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी केली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून हे एसटी सुरू करण्यात आली होती; पण मागील महिनाभरापासून ही एसटी अचानक रद्द करण्यात आली आहे. उपलब्ध एसटीची संख्या कमी असल्याचे कारण देत लांजा डेपोतून सुरू करण्यात आलेली ही एसटी बंद करण्यात आली. ही एसटी सुरू झाल्याने रत्नागिरी मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि नियमित प्रवाशांनी पास काढले होते. ही एसटी बंद झाल्यामुळे सर्वांची प्रवासाची पंचाईत झाली आहे.
त्या दरम्यान दुसरी कोणतीही एसटी नसल्यामुळे या सर्वांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत असून पाससाठी मोजलेले पैसे फुकट जात आहेत. त्यामुळे साखरपा-रत्नागिरी ही एसटी पूर्ववत वेळेत नियमित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 30-11-2024