अंड्याच्या दरात वाढ

श्रृंगारतळी : थंडीची जोरदार सुरुवात झाल्याने अंड्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आता एक डझन अंड्यासाठी ८४ ते ९० रुपये मोजावे लागत आहेत. येत्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. काही भागात तापामानात घसरण झाली आहे.

तर थंड वारे वाहू लागले आहे. थंडीची चाहूल लागताच अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. अंड्यांच्या किंमतीत प्रतिनग दोन ते तीन रुपयांपर्यंत वाढ झाली असून एक डझन अंड्यासाठी ८४ ते ९० रुपये मोजावे लागत आहे. अंडी ही उष्ण असतात त्यामुळे शरीराला उष्णता मिळावी यासाठी हिवाळ्यात प्राधान्याने अंड्यांचे सेवन केले जाते. त्यामुळे थंडीच्या हंगामात सर्रास अंड्यांच्या किमतीत वाढ होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 30/Nov/2024