◼️ मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम
रत्नागिरी : मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उदय सामंत प्रतिष्ठानच्या सहकायनि ३ डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचे आरोग्य शिबीर घेतले जाते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र, या क्षेत्रात कार्यरत पत्रकार यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन संपूर्ण राज्यात केले जाते. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण राज्यात ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता हे शिबीर होणार आहे. विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात उदय सामंत प्रतिष्ठान अग्रेसर असते. पत्रकारांच्या या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी उदय सामंत प्रतिष्ठानने नियोजन केले आहे.
रत्नागिरीकरांना रक्तदानाचे आवाहन
जिल्हा शासकीय रुग्णालयात ३ डिसेंबर रोजी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर झाल्यानंतर ४ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असून नागरिकांनीही या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन उदय सामंत प्रतिष्ठान, मराठी पत्रकार परिषद तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 02-12-2024














