रत्नागिरी : शहरातील चार वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ११ वा. कालावधीत करण्यात आली.
ईश्वर गोविंद वेडगा (२८, मूळ रा. डहाणू सध्या रा. रत्नागिरी), संतोष मधुकर पुसाळकर (४७, रा. झाडगाव, रत्नागिरी), लक्ष्मण रवि नायर (३३, रा. नाचणे, रत्नागिरी) आणि नितीन वसंत रजपूत (३०, रा. मूळ रा. डहाणू, सध्या रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. हे सर्व जण दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली. या चारहीजणांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 02-12-2024














