रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि सावर्डेत बांगलादेशी घुसखोरी प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांचा माग काढण्यासाठी चिपळूण तालुक्यावरच लक्ष केंद्रीत केले आहे.
बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर एकदा आल्यानंतर हळूहळू आपली वसाहतच निर्माण करतात. त्यातून देशाच्या एकतेला धोका निर्माण होतो. त्यामुळे पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदोर येथे 13 बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यानंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी हे प्रकरण गंभीर्याने घेतले.
पोलिस अधिक्षकांनी संपूर्ण जिल्ह्यात ही शोधमाहीम राबवण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली असून दहशतवाद विरोधी पथक अधिक जोमाने कार्यरत झाले आहे. चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घुसखोरीचे पाच आणि सावर्डे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा दाखल झालेला असल्याने या चिपळूण तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
दहशतवाद विरोधी पथक चिपळूण आणि सावर्डेत विनापासपोर्ट कोण कोण दाखल झाले आहेत, याची माहित घेवून घुसखोरांचा शोध घेत असल्याचे चिपळूणातील ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे चिपळूण आणि सावर्डेतील आणखी काही घुसखोरांचा पर्दापाश होण्याची दाट शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्हा शांत आणि संयमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्ह्यात बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची वाढ होऊन त्यांची वसाहत स्थापन होण्यापूर्वीच या मनसुब्यांना सुरूंग लावण्याची भूमिका पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 02-12-2024














