दापोलीत एड्स दिनानिमित्त जनजागृती

दापोली : डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिनानिमित्त आय. सी. टी. सी विभाग, उपजिल्हा रुग्णालय दापोली व एन. के. वराडकर ज्युनिअर कॉलेज दापोली यांचे संयुक्त विद्यमाने दापोली शहरात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभातफेरी एन. के. वराडकर कॉलेज पासून एसटी डेपो, पोलीस लाईन मार्गे बाजारपेठ, नटराज नाका, पोस्ट गल्ली, केळसकर नाका शेवट उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे करण्यात आला. सदर प्रभातफेरी मध्ये एचआयव्ही एड्स जनजागृती विषयक विविध घोषणा देत दापोली शहरात जनजागृती करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे प्रभातफेरी विसर्जन वेळी आयसीटीसी समुपदेशक श्री. पांडुरंग हुबाले यांनी मार्गदर्शन केले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ सागर बुरटे यांनी सर्वाना शपथ देवुन प्रभातफेरीचा समारोप केला. सदर प्रभातफेरी यशस्वी होणेसाठी आय सी टी सी समुपदेशक श्री. पांडुरंग हुबाले, प्रा. बिभीषण ढोबळे प्रा. वळवी सर, प्रा. कोळे मॅडम प्रयोगशाळा तंत्रज्ञ सागर बुरटे यांनी प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 02/Dec/2024