दापोली : हर्णे बंदरात शुक्रवारपासून रविवारपर्यंत तीन दिवसांत पर्यटकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. शनिवारी (ता. ३०) तर मासळी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे हर्णै किनारी मासळीबाजार आणि लिलावाला चक्क जत्रेचं स्वरूप आले होते. गेल्या तीन दिवसांमध्ये सुमारे १० लाखांची उलाढाल या पर्यटकामुळे झाली असल्याचे येथील मासळी विक्रेत्या महिलांनी सांगितले.
सुरमई, पापलेट, हलवा, कोळंबी, बांगडा यासारखी चांगली ताजी मासळी मिळत होती. खवय्यांनी गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये चांगलाच ताव मारला होता. खरेदी केल्यावर तर मासळीसोबत फोटो काढला नाही, असे पर्यटकांकडून होतच नाही. बहुतांश पर्यटक मासळीसोबत सेल्फी किंवा फोटो काढण्याचा आनंद घेत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 02-12-2024














