देवरूख : शहरातील राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी शालेय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे. लहान गटात प्रथम क्रमांकास १ हजार ५००रु., द्वितीय क्रमांक १ हजार २०० रु., तृतीय क्रमांक ९०० रुपये तर उत्तेजनार्थ दोन जणांची निवड करून त्यांना ५०० रुपये बक्षीस दिले जाणार आहे. मोठ्या गटात प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार व तृतिय क्रमांकास १ हजार व उत्तेजनार्थ दोन जणांना प्रत्येकी ७०० रुपये दिले जाणार आहेत.
लहान गटात साडेतीन कि.मी. अंतर असून सकाळी ७ वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. लहान गट साडवली प्लेइयरपॉईंट ते देवरुख कांजिवरा मैत्री पेट्रोलपंप असे मार्ग आहे व मोठ्या गटाचा मार्ग मैत्री पेट्रोल पंप ते लेझ्यर पॉईंट व पुन्हा मैत्री पंप असा आहे. स्पर्धा संपताच लगेच बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धकांनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणावे. स्पर्धकांनी स्वतःची सायकलसह जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अॅकॅडमी अध्यक्ष गणेश जंगम व सल्लागार युयुत्सू आर्ते यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 02/Dec/2024














