चिपळूण : तालुक्यातील पेढांबे- भराडेवाडी क्र. १ या ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरूच होती. सदर ठिकाण हे नागरिकांचे वर्दळीचे आहे. शाळकरी मुले व वाडीतील नागरिकांमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या रस्त्यावर गेले अनेक दिवस गतिरोधक व्हावा, अशी स्थानिक रहिवासी यांची मागणी अखेर शुक्रवारी पूर्ण करण्यात आली आहे. यावेळी माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा. राज्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते योगेश पेढांवकर व वाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
चिपळूण-कराड हायवे असल्याने या ठिकाणी येणारी वाहने ही वेगात न येता आता धीम्या गतीने येत आहेत. त्यामुळे वेगावर नियंत्रण आल्याने गंभीर अपघातांना आळा बसणार आहे. याबाबत कार्यकारी अभियंता, चिपळूण बांधकाम विभाग, चिपळूण यांचे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा. राज्य यांनी व भराडे वाडीतील ग्रामस्थांनी आभार मानले.
माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा. राज्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश पेढांबकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची काही ग्रामस्थांच्या मदतीने कार्यालयीन भेट घेऊन झालेल्या या मार्गावर गतिरोधकासाठी मागणी केली होती. त्याप्रमाणे नुकतेच गतिरोधकाचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भेटीदरम्यान गतिरोधक ज्याठिकाणी टाकण्यात आले आहेत. त्याच्या योग्य अंतरावर पुढे गतिरोधक आहे, असे फलक लावण्यात यावे, अशीही मागणी पेढांबकर यांनी केली आहे.
यावेळी मंडळाचे चंद्रकांत दाभीलकर, नवतरुण मंडळाचे उपाध्यक्ष रामदास सावर्डेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:21 PM 02/Dec/2024














