रत्नागिरी : गावखडी येथे दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू

रत्नागिरी : चालत्या दुचाकीवर चक्कर येऊन पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारांदरम्यान सोमवार २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. सुमारास मृत्यू झाला. अपघाताची ही घटना ३० नोव्हेंबर रोजी गावखडी बंडबेवाडी येथे घडली.

संगीता संजय आखाडे (४५, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ३० नोहेंबर रोजी ती मुलग्याची दुचाकी (एमएच ०८- एवाय-७३०८) वर स्वारामागे बसून आपल्या माहेरी रत्नागिरी ते भालवली अशी जात होती. दुपारी ३.१५ वा. सुमारास गावखडी-बंडबेवाडी येथे त्यांची दुचाकी आली असता संगीताला दुचाकीवर अचानकपणे चक्कर आल्याने ती खाली पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला प्रथम रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. दि. १ डिसेंबर रोजी पुन्हा रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता २ डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 03/Dec/2024