देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी येथील गोविंद तुकाराम पवार (५५) यांनी घरात विषारी औषध प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. विषप्राशन केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली होती. गोविंद पोवार हे मुचरी-भाताडेवाडी येथील शालिनी शांताराम भाताडे यांच्याकडे राहत होते. अज्ञात कारणातून रेटॉल नावाचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते. तेथेच उपचार सुरू असतानाच त्यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 03/Dec/2024














