रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे येथील वृध्दाचा राहत्या घरी आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवार १ डिसेंबररोजी सकाळी ७ वा. सुमारास उघडकीस आली. चंद्रशेखर वासुदेव भट्ट (७२, रा. भट्टवाडी मावळंगे, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. चंद्रशेखर भट्ट हे आपल्या घरी एकटेच रहात होते. रविवारी सकाळी ७ वा. सुमारास ते नेहमीप्रमाणे फूले काढण्यासाठी उठले नाहीत. त्यामुळे खबर देणार यांनी त्यांना हाक मारली असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी मयताच्या घरात जाउन पाहिले असता त्यांना ते बेडवर बेशुध्द अवस्थेत दिसन आले. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 03/Dec/2024












