रत्नागिरी : महिला उद्योजकता विकास कार्यक्रमाची सांगता

रत्नागिरी : भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या वतीने रत्नागिरी शहरातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिलांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला उद्योजकता विकास कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाली.

रत्नागिरी माळनाका येथे ६ ते २७ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीमध्ये टाटा कम्युनिकेशन्स मुंबई पुरस्कृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी पात्रे, विभा कदम, आस्था दिव्यांग संस्था रत्नागिरी अॅड. हेमांगी पालकर समाजसेविका खानविलकर, उद्योजकता विकास संस्थेचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय परुळेकर उपस्थित होते.

या अठरा दिवसांमध्ये महिलांना त्यांची मानसिकता आणि उद्योजकतेचे संस्कार होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ३३ महिलांनी सहभाग घेतला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 03/Dec/2024