रत्नागिरी : रेडिओग्राफीतून पुतळ्यांची झीज, क्रॅकचा घेणार शोध

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. वि. दा. सावरकर, श्री देव विठ्ठलाच्या पुतळ्यांच्या ठिकाणी रेडिओग्राफी करणारी क्ष-किरणसारखी स्कॅन करणारी यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. या रेडिओग्राफीतून पुतळे किंवा मूर्तींची झीज यासह इतर कोणताही बिघाड या रेडिओग्राफीतून स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी शहरातील पुतळ्यांची 2 ते 5 डिसेंबर या कालावधीत मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ही रेडिओग्राफी होणार आहे. या रेडिओग्राफीतून निघणारे क्ष-किरण धोकादायक असल्याने पुतळ्यांच्या ठिकाणच्या रस्त्यांवर मध्यरात्री 1 ते 4 या वेळेत वाहतूक आणि रहदारीवर निर्बंध आहेत. या ठिकाणच्या वाहतुकीवर पोलिसांकडून वाहतूक नियमन केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 03-12-2024