गुहागर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेमध्ये बेकरी दुकानापुढे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी घरगुती सिलिंडरचा बिनधास्त वापर केला जात असून या गोष्टीकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. हे दुर्लक्ष जाणूनबुजून केले जात आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.
शृंगारतळी बाजारपेठेमध्ये बेकरी, चायनिज सेंटर, हॉटेल्स आहेत. येथील काही दुकानदार व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना अनेक दिवस नोंदणी करुनही सिलिंडर मिळत नाही. घरगुती व व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत दुपटीचा फरक आहे. पैसे वाचवण्यासाठी व्यावसायिक छुप्या पद्धतीने घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. संबंधित यंत्रणेने व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलिंडर वापरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 03/Dec/2024














