रत्नागिरी : कुवारबावमध्ये कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी तातडीने जागा उपलब्ध करण्याची मागणी

रत्नागिरी : शहरालगतच्या कुवारबाव गावच्या कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी तातडीने जागा उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अत्यावश्यक प्रकल्पासाठी जमीन मिळत नसल्याने ग्रामसभेने निषेध म्हणून या गावात कोणासाठीही जमीन नाहरकत देऊ नये, असा ठराव करण्यात आला आहे. ज्यांना नाहरकत दिल्या आहेत. त्या रद्द कराव्यात, असेही ठरावात म्हटले आहे.

भाजपचे नेते सतीश नलावडे यांनी यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांना दिले आहे. जिल्हाधिाकऱ्यांना निवेदन देताना दीपक आपटे, शामराव माने, रसिक कदम, संजय माने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 03/Dec/2024