रत्नागिरी : जिल्हा महोत्सवात सांस्कृतिक प्रकारात समूह लोकनृत्य स्पर्धेत हर्चे (ता. लांजा) येथील बॅ. नाथ पै विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला.
संस्कृती व परंपरा जतन करणे तसेच युवकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने राज्य क्रीडा युवा संचालनालय आणि नेहरू युवा केंद्र, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने युवा महोत्सव पार पडला. महोत्सवात विदुर अनंत निवळकर(१२वी) याने विज्ञान युवा कृती (हस्तकला) स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 03-12-2024














