जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार : राजन साळवी

राजापूर : विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार, भविष्यात मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. माझे कार्य यापुढेही अजून जोमाने सुरू राहील. मी सदैव राजापूर-लांजा- साखरपा मतदार संघातील जनतेच्या सेवेत असणार असून, माझी कुठेही गरज लागेल तिथे मी तुमच्यासाठी हजर असेन, असे आश्वासन माजी आमदार राजन साळवी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजापूर येथे झालेल्या सभेमध्ये साळवी यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुन्हा एकदा संघटना बांधणीसह लोकसेवेसाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले. बैठकीला शिवसनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 03/Dec/2024