राजापूर : मुंबईवरील आतंकवादी हल्ल्यातील शहीदाना श्रध्दांजली म्हणुन राजापूर पोलिस ठाण्याच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन यावेळी एकुण ७५ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावले आहे .
शहरातील आंबेडकर भवन येथे सोमवार दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . राजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजाराम चव्हाण व अधिकारी कर्मचाऱ्यानी केलेल्या आव्हाहनाला राजापूर शहरासह तालुक्यातील जनतेने चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले आहे .
या रक्तदान शिबीरासाठी राजापूर तालुक्यातील सर्व पोलिस पाटील , होमगार्ड व तरुण मंडळ यानी सहकार्य केले . नागरिकानी उत्स्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केल्याने राजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजाराम चव्हाण यानी सर्वांचे आभार मानले आहेत . या रक्तदान शिबीरासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 03-12-2024














