दोन महिन्यांत रत्नागिरी वनपरिक्षेत्रातील २०० वानरं पकडण्यात यश

रत्नागिरी : जिल्ह्यात वानर, माकडांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. शेतकरी, बागायती त्यांच्यामुळे उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या मोहिमेला चांगले यश आले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये रत्नागिरी वनपरिक्षेत्रातील सुमारे २०० माकडांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या मोहिमेसाठी आमदार उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे ३० लाख रुपये जिल्हा नियोजनमधून देण्यात आले.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर, माकडांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. यामुळे शेतकरी, बागायतदार उध्वस्त होत आहेत. कोणतीही नवीन शेती करायची म्हटले की हे शेतकरी माघार घेत आहेत शेती. बागायतीसाठी सरकारी योजनांचा लाभ घेता येतो; परंतु लाभ घेतला तरी वानर, माकडांकडून होणारा उपद्रव सहन होण्यापलीकडे गेला.

त्यामुळेच अविनाश काळे यांनी आमरण उपोषण सुरू केले, बानर, माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी शेती, बागायती सोडून देत आहेत. प्रचंड कष्ट करून आणि पैसे खर्च करून पदरात वानर, माकडांमुळे काहीच पडणार नाही. शेती बागायती करायची कशाला, असा एकूण शेतकऱ्यांचा सूर आहे. या आंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम. देवेदर सिंह यांनी माकांचा उपद्रव थांबवण्यासाठी त्यांच्या विरोधात मोहीम आखली.

पिंजरा आणून त्यामध्ये खाद्य टाकून माकड आणि वानरांना पहण्याची मोहीम पावसमधून सुरू झाली; परंतु तेथे अपेक्षित यश आले नाही. रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, लांजा या तालुक्यात मात्र त्या मोहिमेला यश आले. गेल्या दोन महिन्यांमध्ये २०० माकड आणि वानर पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आते. त्यामुळे काही प्रमाणात त्यांचा उपद्रव कमी झाला आहे. ही मोहीम राबवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ३० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. एक माकड पकडण्यासाठी हजार रुपये खर्च आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून माकड, वानर पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांना पकडण्यासाठी दिवस-दिवसभर पिंजरा लावून बसवावा लागतो. एका माकडाला पकडण्याचा खर्च हजार रुपये आहे. आतापर्यंत दोनशे माकड, वानर पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. प्रकाश सुतार, रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 03/Dec/2024