चिपळूण : कंटेनर, टेम्पो आणि बसचा अपघातात पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने खेड आणि चिपळूण मधील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

MIDC मधून शिफ्ट संपवून कर्मचाऱ्यांना घरी नेणाऱ्या बसवर, कंटेनर पलटी झाल्यामुळे कर्मचारी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे परशुराम घाटातील वाहतुकीचा प्रश्न एरणीवर आहे. अश्या परिस्थितीत वाहन चालक सध्या जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:21 PM 03/Dec/2024














