मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनाची बैठक झाली.
भारतरत्न डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावेळी आंबेडकरी जनतेची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. याच नियोजनाचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. यावेळी शिवसेना नेते उदय सामंत उपस्थित होते. तसेच मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी व्हिडीयो कॅानफरसिंगद्वारे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 03-12-2024














