लांजा : देवदिवाळीचे औचित्य साधून गांगोवाडी येथील तरुणांनी एकत्र येऊन रात्रीच्यावेळी हजारो दिवे पेटवून ते साटवली येथील ऐतिहासिक गढीवर ठेवले. या दिव्यांच्या प्रकाशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साटवली गढ़ी उजळून निघाली.
छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाचा ने-आण करण्याच्यादृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलेले साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे आणि स्थानिकांचे दुर्लक्ष झाल्याने सद्यःस्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे; मात्र दुर्गवीर प्रतिष्ठान, शिवगंध प्रतिष्ठान, लांजा व साटवली गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने साटवली किल्ला संवर्धनाच्यादृष्टीने स्वच्छतामोहीम राबवण्यात येते. शिवप्रेमाने प्रेरित होत साटवली गांगोवाडीतील तरुणांनी देवदिवाळीच्या निमित्ताने ही गढ़ी हजारो दिव्यांनी प्रकाशित केला. प्रसाद तरळ, प्रकाश कातकर, सौरभ कांबळे, लक्ष्मण तरळ, नितीन तरळ, सखाराम बापेरकर, शिवाजी तरळ, सचिन तरळ यांनी हजारो दिव्यांची आरास गढीवर केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 04/Dec/2024














