देवरुख : सोळजाई देवीची लोटांगण यात्रा संपन्न

देवरुख : शहराची ग्रामदेवता व तब्बल ४४ खेड्यांची मालकीण असलेल्या सोळजाई देवीचा प्रसिद्ध देवदिवाळी व लोटांगण यात्रा कार्यक्रम सोमवारी झाला.

यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी सोळजाई देवीची ख्याती आहे. देवदिवाळी दिनी सकाळी देवीचे मानकरी, कुमकर यांच्या हस्ते पूजा झाली. यानंतर आरती, नेवैद्य व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. यासाठी देवीचे भक्त संपूर्ण राज्यातून उपस्थित होते. दुपारी लोटांगण नवस फेडण्यास प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात आरती करुन सुरुवात झाली. यात देवीचा जयघोष करुन भोवत्या व लोटांगण सुरु झाले.

ताशे व टाळ, मृदुंगांनी भक्तांनी मातेचा जयजयकार केला. लोटांगणसाठी २३ भक्त सहभागी झाले. हा विधी एक तास चालला. यानंतर आरती पूर्ण करुन नवस फेडण्यात व नवीन नवस बोलण्यात आले. या लोटांगणाला सुरुवात होताच यात्रा भरली. देवीचे दर्शन व यात्रेचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 04/Dec/2024