करबुडे येथे तरुणाला बॅटने मारहाण

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे पाचकुडेवाडी येथे तरुणाला एकाने अज्ञात कारणातून बॅटने जबर मारहाण केली. ही घटना सोमवार २ डिसेंबर रोजी दुपारी ३.१५ वा. सुमारास घडली.

स्वप्निल वाळू पाचकुडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात अशोक गणपत पाचकुडे (३९) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, सोमवारी दुपारी अशोक पाचकुडे हा करबुडे मावळती पाचकुडे वाडीत देव दिवळीचे विडे भरण्यासाठी वाडीत जात होता. त्यावेळी संशयित आरोपी हा दारु पिउन हातात बिअरची बाटली व बॅट घेउन तिथे आला. तेव्हा अशोक पाचकुडेने त्याला ‘तू येथून निघून जा’, असे सांगितले. त्याचा राग आल्याने संशयित स्वप्निल पाचकुडे फिर्यादीच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ केली. तसेच हातातील बॅट त्याच्या डाव्या हातावर आणि उजव्या गुडघ्यावर मारुन दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),११५,३५२,३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 04-12-2024