चिपळूण : वन्यजिवांची वास्तव्याची ठिकाणे मानवी अतिक्रमणामुळे नष्ट होत असल्याने हे वन्यप्राणी शहराकडे वळताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत चिपळूणनजिकच्या गणेशखिंड पाचाड येथे असलेल्या खासगी वनक्षेत्रात म्हणजेच नार्वेकर सॅन्च्युरीमध्ये दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचा वावर वाढत आहे. जंगल संपत्तीच्या दृष्टीने ही एक दिलासादायक बाब असल्याचे मत निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
सध्या विकासाच्या नावासकट व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. सजिवांचा श्वास असलेल्या ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे प्रदूषण वाढून ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्याची चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर वनसंपदेच्या माध्यमातून आसऱ्याला असणाऱ्या वन्यजिवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. काळाच्या ओघात काही वन्यजीव ज्यामध्ये चित्तासारखे वन्यप्राणी भारतातून नामशेष झाले आहेत. या सर्व घटनाक्रमांचा विचार करता वनसंपदा आणि वन्यप्राणी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी काही निसर्गप्रेमी पुढे येत आहेत. त्यातूनच शहरानजिकच्या गणेशखिंड येथे असलेल्या पाचाड या ठिकाणी नार्वेकर सॅन्च्युरीच्या माध्यमातून खासगी वनक्षेत्र एकप्रकारे वन्य पशू-पक्षांचा सांभाळ व संरक्षण होत आहे.
या खासगी वनक्षेत्रात अनेक प्रकारचे दुर्मीळ वृक्ष, औषधी व आयुर्वेदिक वृक्षांसहीत विविध हंगामातील पक्ष्यांचा अधिवास तयार झाला आहे. त्यातच आता दुर्मीळ होत चाललेल्या प्राण्यांचाही वावर हळूहळू वाढला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 04/Dec/2024














