संगमेश्वर : आंगवली बानदीपात्रात अवैध वाळू उपसा

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली बावनदी पात्रामध्ये गेल्या महिन्यापासून अवैध वाळू उपसा होत आहे. वाळूचे ढिगही नदीपात्रालगत दिसून येत आहेत. या बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ २६ जानेवारीला उपोषणाच्या पावित्र्यात आहेत.

महसूल विभागाच्या आशीर्वादमुळे राजरोस पणे वाळू उपसा होत आहे. बुरबी घोडदे वाकी, सेवर कोंड पातळी, आंगवली मार्लेश्वर मंदिर शेजारी आणि बीएसएनएल टॉवर शेजारी नदीपात्रात वाळू उपसा केला जात आहे. वाळू उपसा राजकीय नेते व महसूल विभाग यांच्या आशीर्वादानानेच होत आहे. देवरुख, मारळ, बामणोली, हातीव, कासार कोळवण, निवे खुर्द, साखरपा, वांझोळे पंचक्रोशीमध्ये ट्रक व डम्पर च्या सहाय्याने दिवसा व रात्री वाळू नेली जात आहे तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांच्या दुर्लक्ष यामुळेच हा वाळू उपसा होत आहे. निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी देवरुख तहसील कार्यलयासमोर उपोषण करून जाव विचारला जाणार आहे. वाळू उपशामुळे आंगवली बावनदी पात्राची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून आंगवली पंचक्रोशी तसेच गोठने पुनर्वसन शेजारी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 04/Dec/2024