Maharashtra Politics: राज्यात राजकीय घडामोडींना वेग! विधानभवनात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 10 ते 12 दिवस झाले आहेत. तेव्हापासून राज्यात सरकार स्थापनेबाबातच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून अद्याप पेच सुरू आहे.

आज (बुधवारी) महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने बैठक सुरू आहे. यासाठी भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक पार पडत आहे. गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याची देखील चर्चा सुरू आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी भाजपचे नेते विधानभवनात दाखल होता आहेत. केंद्रीय निरीक्षकही बैठकीला दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी भाजपकडून निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपच्या गटनेता निवडीनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अन्य नेते दाखल झाले आहेत.

भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवड कशी होणार?

केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत विधिमंडळ गटनेते निवडीची बैठक पार पडेल.

भाजपचे 132 विजयी आमदार यासोबतच भाजपला पाठिंबा असणारे अपक्ष आमदार उपस्थित असतील.

भाजप – मित्रपक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असावा याबद्दलचा प्रस्ताव भाजपतील जेष्ठ नेता ठेवणार आहेत.

चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा या जेष्ठ्य आमदारांपैकी एक जण प्रस्ताव मांडू शकतो.

केंद्रीय निरीक्षक या प्रस्तावावर उपस्थित आमदारांचं मत जाणून घेतील.

उपस्थित आमदारांपैकी प्रमुख जेष्ठ आमदार या प्रस्तावावर आपलं अनुमोदनपर मत जाहीर करतील.

गटनेत्याच्या नावावर बहुमतानं शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याच नाव जाहिर करतील.

उपस्थित आमदारांपैकी जेष्ठ आमदार नियुक्त गटनेत्याबद्दल आपलं मत व्यक्त करतील.

गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 04-12-2024