राजापूर : वाटूळमध्ये रंगणार ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

राजापूर : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि वाटूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी २०२५ ला वाटूळ येथे १० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. राजापूर-लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांच्या अध्यक्षतेखाली वाटूळ येथे झालेल्या बैठकीत तीन दिवस होणाऱ्या या साहित्य संमेलनाची रूपरेषा ठरवण्यात आली.

साहित्य संमेलन व्यवस्थापन समितीत २७ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील कलागुणांना चालना मिळावी आदी विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजापूर-लांजा नागरिक संघातर्फे गेल्या नऊ वर्षांपासून विविध भागांमध्ये ग्रामीण साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे नव्या वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये वाटूळ येथे दहावे ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातील विविध कार्यक्रमाचे आतापासून नियोजन केले जात आहे. त्यामध्ये ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, कथाकथन, चर्चासत्र, व्याख्यान आदीचा समावेश असणार आहे. वाटूळ येथील सभेला गणेश चव्हाण, जयराज मांडवकर, दीपक नागवेकर, महेंद्र साळवी, प्रा. विजय हटकर, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

साहित्य संमेलन व्यवस्थापन समिती
अध्यक्ष-सुहास चव्हाण, उपाध्यक्ष संतोष भुर्के, प्रशांत चव्हाण, सचिव-विशाल मोरे, उपसचिव प्रकाश वळंजू, खजिनदार कृष्णा चव्हाण, सहखजिनदार विजय चव्हाण, समिती सदस्य महेंद्र कुलपे, अजय धावडे, विजय मोहिते, दिगंबर मांडवकर, प्रसतन्न खांबे, वर्षा चव्हाण, नलिनी चव्हाण, प्रियांका भुर्के, उर्मिला यादव, पूजा चव्हाण, माही गुरव, संतोष (बंधू) चव्हाण, संजय चव्हाण, नारायण चव्हाण, स्वप्नील चव्हाण, संतोष वि. चव्हाण, मंदार चव्हाण, प्रकाश चव्हाण, मनीष गुरव, दशरथ वीर, संमेलन संयोजक-विराज चव्हाण.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 04/Dec/2024