रत्नागिरी : शहरातील भाटीमिऱ्या येथे किरकोळ कारणातून तरुणाला चारजणांनी मिळून मारहाण केली. ही घटना रविवार १ डिसेंबर रोजी रात्री १० वा. सुमारास घडली. विशाल जोशी, सुशांत जोशी, सुशील जोशी आणि एक महिला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात ओंकार दिनेश कुरचुंडकर (२७) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, रविवारी रात्री १० वा. फिर्यादी ओंकार हा आपल्या राहत्या घरी त्याच्या चुलत बहिणीच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजावून सांगत होता. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या चार संशयितांनी तिथे येत आपच्या विशालचे नाव का घेतोस अशी ओंकारला विचारणा केली. तसेच त्याच रागातून सुशील जोशीने ओंकारच्या डोक्यात नारळाच्या झावळीने डोक्यात मारहाण केली. इतर तीन संशयितांनी ओंकारला हातांच्या थापटाने मारहाण व शिवीगाळ करत ‘तुला बघून घेतो’, अशी धमकी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 04-12-2024














