रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा तालुकास्तरावर दादासाहेब सरफरे विद्यालय प्रथम

रत्नागिरी : राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा क्र. २ हे अभियान राबविण्यात आले होते.

या स्पर्धात्मक अभियानात खासगी व्यवस्थापनामध्ये संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे दादासाहेब सरफरे विद्यालय तालुक्यात प्रथम आले आहे. शाळेने पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास, शासकीय योजनांचा लाभ इत्यादी अनेकविध घटकांचा व उद्दिष्टांवर काम करत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

त्याबददल, संस्थेचे अध्यक्ष अशोक सरफरे, उपाध्यक्ष राजाराम गर्दे, उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, सरचिटणीस दिलीप मोरे, सचिव शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, संचालक दिनेश जाधव, संचालक सचिन मोहिते, संचालक ललितकुमार लोटणकर, सर्व संचालक मंडळ, सर्व पालक, गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुणे, श्री. नाईक ,सौ. आखाडे, केंद्रप्रमुख सुरेश बावदाणे यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या यशस्वीतेकरीता पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश वीरकर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी-संचालक, विद्यार्थी, पालक या सर्वांचे आभार मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 04-12-2024