रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश रामचंद्र ठिक (वय ४४) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास साळवीस्टॉप येथे स्विमिंग पुलच्या बाजूला एका ट्रकच्या आडोशाला निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महेश ठिक हे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत होते. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 04-12-2024














