खेड : खेड तालुक्यातील खोपी येथील श्री काडसिद्धेश्वर अध्यात्म प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे अध्यात्म केंद्र खोपी मठ येथे ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कणेरी मठ, कोल्हापूर येथील मठाधिपती परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचा दर्शन व प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ५ वाजता श्री स्वामींचे आगमन, ५ ते ६ दर्शन सोहळा, ६ ते ७ सांप्रदायिक भजन, ७ वाजता श्री स्वामींचे प्रवचन, आरती व त्यानंतर महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 04/Dec/2024














