खेड : रामगड किल्लावर श्रमदान मोहीम

खेड : खेड तालुक्यातील नव्याने उजेडात आलेल्या रामगड (रामदुर्ग) वर श्रमदान मोहीम ०१ डिसेंबर रोजी संपन्न झाली. सदर मोहिमेमध्ये मुख्य प्रवेशद्वारच्या डाव्या बाजूस असलेल्या बुरुजाची आतील बाजू व तटबंदीची आतील बाजू चा काही भाग जो कित्येक वर्षे दगड मातीखाली गडला गेला होता तो मुक्त करण्यात आला. पडलेल्या तटबंदीचे दगड पुन्हा व्यवस्थित रचण्यात आले.

या मोहिमेमध्ये दुर्गवीर चे रोहित बालडे, राकेश इंदुलकर, स्वप्नील पाडावे, स्वप्निल गायकवाड, माणगाव मधून विठ्ठल केंबळे आणि सुयोग पाटील तर संगमेश्वर मधून यश ओकटे आणि मुंबई मधून आकाश गायकवाड हे सहभागी झाले होते.

हा ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धित करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असेही त्यांनी म्हटले आहे, म्हणून या श्रमदान कार्यात आपण ही सहभाग घ्या, आपला ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढील मोहिमांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 04/Dec/2024