रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७ डिसेंबरला कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे रत्नागिरीतील प्रथितयश अशा जागृत मोटर्स प्रा. लि. यांचेकरिता शनिवार दि. ०७ डिसेंबर २०२४ रोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

जागृत मोटर्समधील विविध जागांकरिता सदर मुलाखती होणार आहेत. महाविद्यालयातून २०२२-२३; २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तसेच उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होऊ शकतात.

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी वरील दिवशी आपला बायोडेटा आणि आवश्यक त्या कागदपत्रांसहित महाविद्यालयात सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे असे कळविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी डॉ. रुपेश सावंत, समन्वयक, करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेल, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (मोबा. ९४२११४२५२९) किंवा श्री. अक्षय पाटील, जागृत मोटर्स, रत्नागिरी (मोबा. ९८६७७३३८८९) यांचेशी संपर्क साधावा. तसेच उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 04/Dec/2024