संगमेश्वर : आरवली गडनदीत बुडून बेपत्ता झालेल्या प्रशांत भागवत या तरुणाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज (४ डिसेंबर) सकाळी सापडला.
प्रशांत भागवत (२१) हा तरुण सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्याची काकी कपडे धुण्यासाठी गेली असता तिच्यासोबत गेला होता. पाण्यात टब वाहून गेला असता त्याने टब पकडण्यासाठी पाण्यात उडी घेतली; मात्र तो पाण्यात बुडाला. त्याचा ग्रामस्थांमार्फत शोध सुरू होता. अखेर आज सकाळी शोधकार्यादरम्यान त्याचा मृतदेह आढळला. घटनास्थळापासून काही अंतरावर प्रशांतचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 04/Dec/2024














