संगमेश्वर : तालुक्यातील धामापूर भुसेवाडी येथील रस्ता अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उजळला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली. ग्रामस्थांनी याबाबत प्रशांत यादव यांचे आभार मानले.
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर भुसेवाडी रस्ता गेली काही वर्षे अंधारात होता. या रस्त्यावर पथदीप नसल्यामुळे ग्रामस्थांना रात्री अंधारातून वाट काढत प्रवास करावा लागत होता. अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे कुणी लक्ष दिलेले नव्हते; मात्र चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यादव यांच्याकडे ग्रामस्थांनी ही बाब मांडली. त्या वेळी यादव यांनी ग्रामस्थांची ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दुर्दैवाने, यादव यांचा अल्पमतांनी पराभव झाला. तरी खचून न जाता त्यांनी ठिकठिकाणी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याकरिता सुरवात केली आहे. त्यानुसार संगमेश्वर तालुक्यातील धामापूर भुसेवाडी रस्त्यावर सौर पथदीप बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ सुभाष महाडिक, अशोक महाडिक, संतोष भागडे, संतू भोजने, आकाश महाडिक, अनिकेत कांबळी, संजोग भागडे, अक्षय भागडे, अक्षय कांबळी, रूपेश कांबळी, गौरव वरेकर यांनी या संदर्भात आभार मानले.
लोकार्पण सोहळा लवकरच आश्वासनाची पूर्तता केल्यामुळे यादव यांचा सत्कार करणार असल्याचे धामापूर ग्रामस्थांनी सांगितले तसेच लवकरच या विकासकामाचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 04/Dec/2024














