मुंबई : विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी लगबग चालू आहे. आज म्हणजेच 5 डिसेंबर 2024 रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
आज गुरुवारी (5 डिसेंबर) भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
तर फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी जय्यत तयारी चालू आहे. आझाद मैदानात कोणताही अनुचूत प्रकार घडू नये तसेच शपथविधी समारंभाला लोकांची होणारी गर्दी लक्षात घेते येथे जवळपास 1500 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 5 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 05-12-2024














