रत्नागिरी : खेडशी पुष्पेंद्र सिटी येथून दुचाकी चोरीस

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथून दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास घडली आहे. याप्रकरणी हेमंत विभीषण दराडे (४९, रा. खेडशी, पुष्पेंद्र सिटी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी ते रहात असलेल्या पुष्पेंद्र सिटीच्या गेटजवळ आपली दुचाकी (एमएच-०८- एटी-४९५१) पार्क करुन ठेवली होती. ती अज्ञाताने चोरुन नेली. आपली दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी आजुबाजूला शोध घेऊन मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 05/Dec/2024