सावर्डे : गांधीजींनी आयुष्यामध्ये जपलेल्या नीती मूल्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांमध्ये होणे अपेक्षित असून, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छतेचे महत्त्व समजावे व विद्यार्थ्यांमार्फत घराघरात हा संदेश पोहोचावा याची जाणीव व जागृती युवा पिढीमध्ये व्हावी या उद्देशाने गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगावमार्फत दरवर्षी गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा राज्यस्तरीय असून, या स्पर्धेमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
फाऊंडेशनकडून प्रत्येक इयत्तेनुरूप विविध जीवनमूल्यांची ओळख करून देणाऱ्या विचारांवर आधारित अभ्यासक्रमाचे स्वतंत्र पुस्तक दिले जाते. या परीक्षेत विद्यालयातील इ.५वी-११३, इ.६वी ११९, इ.७वी-७८, इ.८वी १९७, इ.९वी-२२५, इ.१०वी-२२३, इ.११वी ३९९, इ.१२वी -३४४ असे एकूण १ हजार ६९८ विद्यार्थी प्रवीष्ठ झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 05/Dec/2024दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 05/Dec/2024














