रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : शहरातील भाटये ते पावस जाणाऱ्या रस्त्यावरील बिअर शॉपीच्या बाहेर तसेच मच्छिमार्केट ते चर्चरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पडीक शाळेच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास करण्यात आली. दिनेश रघुनाथ जुवेकर (४३, रा. खंडेवाडी, राजापूर), सलीम रज्जाक मेमन (४८, रा. तांबट आळी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघेही दारु पिण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यासाठी बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 05/Dec/2024