Breaking : उपमुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा अखेर होकार; राजभवानाला दिली माहिती

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला आहे. मोठ्या सस्पेंसनंतर त्यांनी शपथविधीच्या सुमारे दोन तास आधी उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यासाठी होकार दिला. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजी झाल्याची माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली आहे.

आज संध्याकाळी आझाद मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात शपथही घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे हे अखेर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राजभवनात सरकारकडून शपथ घेणाऱ्यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे देखील नाव आहे. दुसरीकडे, उदय सामंत यांनी आपणही पत्र घेऊन राजभवनावर जात असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर उदय सामंत यांनी राजभवनाच्या सचिवांकडे त्यांनी ते पत्र सूपूर्द केलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 05-12-2024