एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानात संपन्न झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याला (Mahayuti Oath Taking Ceremony) विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक मान्यवर, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि भाजपचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

तत्पूर्वी आज सकाळपासून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत संभ्रम होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गृहमंत्रीपदाची मागणी लावून धरली होती. मात्र, भाजप गृहखाते शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही, या विचारात होते. मात्र, एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात नसल्यास चुकीचा राजकीय संदेश जाऊ शकतो, ही बाब ध्यानात घेऊन भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी प्रयत्नशील होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे की नाही, हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम ठेवला होता. अखेर शपथविधीसाठी अवघे दोन तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात गेले आणि त्यांनी राज्यपालांकडे एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे पत्र सुपूर्द केले होते.

एकनाथ शिंदे यांनी आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जातीने प्रयत्न केले होते. त्यांनी बुधवारी वर्षा बंगल्यावर दोनवेळा जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. वर्षा बंगल्यावरील अँटी-चेंबरमध्ये उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीचा भाजप नेतृत्त्वाकडून विचार केला जाईल, असे सांगितले. आपल्याला एकत्र मिळवून सरकार चालवायचे आहे. आपण कोणालाही साईड कॉर्नर करणार नाही. आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे. तुम्ही आज शपथ घेतली नाही तर चुकीचा अर्थ काढला जाईल, असे फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले. याशिवाय, शिवसेनेच्या सगळ्या आमदारांकडून काल रात्रीपासून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तुम्ही मंत्रिमंडळात असणे महत्त्वाचे आहे. तुमच्याशिवाय आम्हीदेखील मंत्रिमंडळात बसणार नाही, अशी निर्वाणीची भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली. या सगळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज (दि.12) सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडतोय. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. तर एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे या अजित पवार यांनी महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याची विक्रम केला आहे. महायुतीच्या शपथिविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते. याशिवाय, अनेक सेलिब्रिटींनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.

अजित पवारांचा आजपर्यंतचा प्रवास

बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त.

सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था, पुणे

रयत शिक्षण संस्था, सातारा संचालक

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष – ऑगस्ट 2006 ते 19 ऑगस्ट 2018.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष – सप्टेंबर 2006 पासून

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च 2013 पासून

सेवादास संचालक : महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर 2005 ते मार्च 2013 आणि 25 नोव्हेंबर 2018 पासून अध्यक्ष म्हणून काम करत आहे

पूर्वीच्या विधानसभा / विधानपरिषद / लोकसभा / राज्यसभेचे सदस्य आणि संसद सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
लोकसभा सदस्य : जून 1991 ते सप्टेंबर 1991

विधानसभा सदस्य : 1991 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते सप्टेंबर 2014, 2014 ते 26 सप्टेंबर 2019. २०१९ ते २०२४

राज्य/केंद्रीय मंत्री/राज्यमंत्री म्हणून केलेले काम (कार्यकाळात)

कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून 1991 ते नोव्हेंबर 1992

पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993

पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004

ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ): जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४

जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता : नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९.

जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०

उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012

उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014

उपमुख्यमंत्री : 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019

उपमुख्यमंत्री : 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022

विरोधी पक्षनेते : ४ जुलै 2022 ते ३० जून 2023

उपमुख्यमंत्री : २ जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 05-12-2024