रत्नागिरी : मारुती मंदिर ते जयस्तंभपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते जयस्तंभापर्यंतच्या मार्गावरचे काँक्रिटीकरण काम गुरुवारपासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात मारुती मंदिर ते माळनाकापर्यंतचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. प्रथम एका दिशेच्या मार्गावरचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिशेच्या मार्गाचे काम केले जाणार आहे.

मारुती मंदिर ते जयस्तंभपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी डांबर ग्रीटचा पहिला थर रस्त्यावर पसरवण्यात आला होता. परंतु काँक्रिट टाकण्यापूर्वीच जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि टाकलेला पहिला थर वाहून गेला. त्यामुळे हे काँक्रीटचे काम लांबणीवर पडले.

गुरुवारपासून काँक्रीटचे काम सुरू झाल्यानंतर पुन्हा पहिला डांबर-ग्रीटचा थर टाकून त्यावर प्लास्टिकचे कापड अंथरण्यात आले. त्यानंतर त्यावर काँक्रीट लागले. ओतले जाऊ पहिल्या टप्प्यात शहरातील मारुती मंदिर ते माळनाकापर्यंतचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले. या आधी मारुती ते मंदिर ते साळवी स्टॉप, नाचणे रोड तसेच मारुती मंदिर ते चार रस्त्यापर्यंतचे कॉक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 27/Sep/2024