रत्नागिरी : बोटीवरील लोखंडी कप्पा लागून खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी : अडीच महिन्यांपूर्वी मिरकरवाडा येथील मासेमारी बोटीवर काम करत असताना बोटीतील लोखंडी कप्पा तुटून पायावर लागल्याने गंभीर दुखापत होऊन जखमी झालेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

संतोष वना तुंबडा (२६, मूळ रा. डहाणू, पालघर सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. १६ सप्टेंबर रोजी तो मिरकरवाडा येथील समृद्धी २ या बोटीवरून मासेमारी करण्यासाठी जात होता. प्रवासादरम्यान बोटीतील लोखंडी कप्पातुटून त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला श्रीवर्धन रायगड येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 06/Dec/2024