चिपळूण : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची राज्य कार्यकारिणी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. राज्य कार्याध्यक्षपदी रामहरी राऊत तर कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी आपल्या स्वाक्षरीने राज्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे. विभागीय सचिवपदी उत्तर महाराष्ट्र सचिवपदी जितेंद्र गवळी, पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी गौरव गुळवणी, पूर्व विदर्भ विभागीय सचिवपदी चंद्रशेखर चड्डे, गजानन ठाकूर, कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे त्याचप्रमाणे विभागीय संपर्क प्रमुखपदी अमित वरणकर (पश्चिम विदर्भ विभाग), सूरज जम्मा (पश्चिम महाराष्ट्र), गजानन गिरी (मराठवाडा विभाग), प्रशांत साळुंके (पश्चिम महाराष्ट्र विभाग), राज गुहागरकर (मुंबई विभाग), हनुमंत पाटील (मराठवाडा विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून गणपत कांबळे, रणजित परदेशी, अमोल पाटील, निखिल बुडजडे, योगेश म्हस्के, सीमा कल्याणकर, सोनाली देशमुख, चिराग आनंद, धनजंय पवार, भूषण सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.
कोकण विभाग सचिवपदी शशिकांत वाघे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 06/Dec/2024